Veena Jagtap's New Serial: 'You Know What' | ‘यू नो व्हॉट' | वीणाने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

2021-10-27 0

‘राधा प्रेम रंग रंगली’ या मालिकेमुळे अभिनेत्री वीणा जगताप ही घराघरात पोहचली. तसेच वीणाला बिग बॉस मराठी २ मधून बरीच पसंती मिळाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर वीणा आई माझी काळूबाई या मालिकेमुळेही बरीच चर्चेत आली. यानंतर वीणा कोणत्याही मालिकेत झळकली नाही. नुकतीच वीणाने तिच्या सोशल मीडियाव्दारे एक आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. लवकरच वीणा एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. इन्स्टाग्रामवर याचा एक फोटो पोस्ट करत तिने तिच्या नव्या प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना दिली आहे. ‘यू नो व्हॉट’ या नव्या प्रोजेक्टमधून वीणा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. या प्रोजेक्टमध्ये तिच्यासोबत अभिनेता आशय कुलकर्णी देखील झळकणार आहे. या प्रोजेक्टमधून वीणा-आशय ही नवी प्रेक्षकांसमोर येणारे. नुकताच या प्रोजेक्टचा मुहुर्त पार पडला आहे. याचे फोटो वीणाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. मात्र हा प्रोजेक्ट सिनेमा असणार की वेबसीरिज हे अजूनही समोर आलेले नाही. प्रेक्षक या दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी खूप एक्सायटेड आहेत. (Snehal VO)

#VeenaJagtap #YouKnowWhatMarathiSerial #LokmatFilmy

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires